उत्तर प्रदेशात राष्ट्रिय समाज पक्ष लोकसभेला दंड थोपटणार..?
By Abaso Pukale, मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यात फक्त आम्ही एनडीए सोबत आहोत. महाराष्ट्र राज्याबाहेर आम्ही एनडीए सोबत नसल्याचे श्री. जानकर यांनी निक्षून सांगितले आहे. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी दंड थोपटायला सुरूवात केली आहे. काल दिनांक २९ जून रोजी राष्ट्रीय समाज पार्टी उत्तर प्रदेश राज्य शाखेची बैठक राजधानी लखनऊ येथे पार पडली. ब्लाक कामन हाॅल दारूलसफा लखनऊ येथील बैठकीसाठी उत्तर प्रदेश प्रांत अध्यक्ष चंद्रपालजी, राज्य संघटनमंत्री ठाकुर प्रदीपसिंह तोमर, रमाशंकर पाल, श्रीमती अर्चना मिश्रा, अनिलकुमार पाल(मिर्जापुर), रामलखन पाल, राजाराम पाल, श्रीधर चतुर्वेदी- कानपुर, श्याम पाल, पीसी पाल आदी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सर्व जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी एकजुटीने येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन मजबूती, विभागस्तरीय बैठका, जिल्हास्तरीय बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. लवकरच राजधानीत दहा लाख लोकांचा कार्यकर्ता महामेळावा आयोजीत करण्याचे ठरले.
उपस्थित पदाधिकारी यांनी एकमताने एकला चलोचा नारा देऊन, कोणासोबत कोणत्याही प्रकारची आघाडी युती गटबंधन न करता स्वबळावर सर्व जागांवर उमेदवार उतरवून निवडणूक लढवण्याचा संकल्प केला. रासपचे वाराणसी, कानपूर, गाझियाबाद, जौनपुर, प्रतापगढ, मिर्झापूर, नोएडा, अलाहाबाद, कन्नोज, भदोही, लखिमपुर खिरी, सितापुर आदी मतदासंघांत रासपचे संघटन मजबूत आहे. स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्र ताकद आजमवली आहे.
No comments:
Post a Comment