भोजेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
दि 1/6/2023 रोजी गुरुवारी साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून हिवरा भोजेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच गजराबाई बाबासाहेब गोफणे प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, डॉ. शिवाजी शेंडगे, अशोक ढवण, कृष्णा खटके, आमोल लगड, बाबासाहेब गोफणे तसेच भोजेवाडी येथील ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. अशोक काळे हे लाभले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर सुंदर असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धुळाजी लकडे यांनी केले. आभार अमोल खटके यांनी मांडले.
No comments:
Post a Comment