Saturday, June 24, 2023

मानेवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

 

मानेवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी 

आज मानेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली, या दिनाचे औचित्य साधून आरोग्य व सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल गावातील तीन महिलांना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत कार्यालय मानेवाडी मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुरस्काराचे मानकरी 1) मानेवाडी गावचे माजी सरपंच सौ वैशालीताई चंद्रसेन आवारे यांनी यांच्या काळात गाव हागणदारी मुक्त करून गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून दिला. 2) सौ. उल्फा नितीन माने आशासेविका यांनी कोरोनाच्या काळात गावामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 3) सौ लखापती सुरेश शिंदे अंगणवाडी मदतनीस यांचे कार्य एक वर्ष झाले गावाला अंगणवाडी शिक्षिका नसतानाही मुलांची व्यवस्थितरीत्या देखभाल करून कोरोनाच्या काळात ही आपले योगदान दिले. यावेळी उपस्थित मानवडीचे सरपंच सौ. सोनाली प्रदीप माने, उपसरपंच सुखदेव बापू माने, ग्रा.पं. सदस्य सौ. वर्षा महादेव माने, उद्योजक श्री. श्रीहरी तात्या माने, सोसायटीचे चेअरमन श्री सुग्रीव नाना इंगोले, संचालक श्री विक्रम बप्पा माने, संचालक श्री राम मामा शिंदे, ग्रामरोजगार सेवक श्री युवराज भाऊ माने, श्री डीगू तात्या आवारे, श्री. दत्तू तात्या आवारे, श्री नामदेव माने, श्री दामोदर माने, श्री मुरलीधर माने श्री अंकुश माने, श्री सिद्धेश्वर माने, श्री राजेश आवारे. महिलांमध्ये सौ. गया काकी माने, सौ. सुनीताताई माने, सौ.यमलबाई माने, सौ. जनाबाई शिंदे, सौ. सुनीताताई आवारे, सौ.सुवर्णा माने, सौ.राजू ताई माने, सौ अयोध्याताई सोनवणे तसेच प्रतीक आवारे, सौरभ आवारे, अक्षय माने, सुधीर आवारे, पांडुरंग डोके, रमेश मोरे, गणेश कचरे, राहुल जाधव आदी जणांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...