Saturday, June 24, 2023

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ठाणे शहरातील समस्त धनगर समाज बांधवांनी काढली भव्य रॅली

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ठाणे शहरातील समस्त धनगर समाज बांधवांनी काढली भव्य रॅली 


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ठाणे शहरातील समस्त धनगर समाज बांधवांनी. जय मल्हार ग्रुप ठाणे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी ठाणे शहरामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅली करता विशेष सहकार्य धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे जिल्हा यांनी केले. या बाईक रॅलीमध्ये ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक ॲड. श्री नानासाहेब मोटे, ॲड. श्री जगदीश शिंगाडे, श्री नरेश शिरगिरे, श्री.शहाजी सरग श्री अमोल घुरडे. ठाणे शहरातील उद्योजक श्री उत्तम यमगर, श्री उद्धव गावडे, श्री अभिजीत चोरमले, श्री उमेश यादव, श्री आकाश इरकर, कु. शैलेश गायके, श्री योगेश शिरगिरे, श्री आप्पा इरकर, श्री विनोद बंडगर विवेककुमार पाल, श्री बापू सुळ, जय मल्हार मित्र मंडळ लोकमान्य नगरचे अध्यक्ष श्र. सत्यवान कोडलकर, श्री महेश खरात, कु. मंगेश खरात, श्री दत्तात्रय वाघमोडे, श्री संदीप घुले, श्री दत्तात्रेय वाघमोडे. श्री हेमंत घुले, श्री राजेश पाल,कु‌ सुमित कोंडलकर, कु. सुरज शिरगिरे, कु.आर्यन शहाजी सरग, कु. हर्ष शहाजी सरग, कु. गणेश शिरगिरे, कु. कार्तिक शिरगिरे, कु. आदित्य शिरगिरे आदी समाज बांधवांनी ठाणे शहरात श्री मायाक्का बिरदेव मंडळ आयटीआय सर्कल वागळे स्टेट येथून लोकमान्य नगर, मानपाडा, पातलीपाडा, मनोरमा नगर येथून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर संकुल मासुंदा तलाव ठाणे या सर्व ठिकाणी साजरी होत असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळांना भेट दिली. बाईक रॅलीच्या आयोजकांचे धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सत्कार करण्यात आला आणि बाईक रॅली ची सांगता केली.

या बाईक रॅली करता लागणारे साहित्य फेटे, झेंडे, मफलर हे ज्येष्ठ समाजसेवक ॲड.श्री नानासाहेब मोठे , ज्येष्ठ समाजसेवक श्री बाबासाहेब दगडे, ॲड. श्री जगदीश शिंगाडे, आणि डॉक्टर श्री अरुण गावडे यांनी उपलब्ध करून दिले. साहेब तुमचा हात सदैव आमच्या डोक्यावर राहून दे हीच बाळुमामा चरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...