Thursday, June 29, 2023

राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन ताकतीने साजरा करू : काशिनाथ शेवते

राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन ताकतीने साजरा करू : काशिनाथ शेवते

पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीप्रसंगी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, भगवान ढेबे, मनिषाताई ठाकुर,युवा नेते अजितदादा पाटील, सुदामशेठ जरग, मुकेश भगत, शरदभाऊ दडस, आण्णासाहेब वावरे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते.(छायाचित्र : ऋषिकेश जरग)

By Abaso Pukale, कळंबोली : राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन ताकदीने साजरा करू, असे प्रतिपादन राष्ट्रिय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते यांनी केले. आज दि. २९ जून रोजी श्री. शेवते हे कळंबोली नवी मुंबई येथे राष्ट्रिय समाज पक्ष जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलत होते.

श्री. शेवते पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. शिस्तीचे पालन न केल्यास स्वतःची, पक्षाची, नेतृवाची फसवणूक होते. राष्ट्रिय समाज पक्ष आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. जानकर साहेब कॅबिनेटमंत्री असताना आपला पक्ष स्वबळावर निवडणुकित सामोरे गेले होता. आताही कोणत्याही प्रकारची निवडणुकीत आघाडी, युती होणार नाही. पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गाफील न राहता आपापल्या विभागात निवडणुकीच्या तयारीला लागावे. समतेची भूमी असणाऱ्या पुणे शहरात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या महामेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे. लोकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरण पोहचवले पाहिजेत. वेगवेगळ्या प्रभागात बैठका घेतल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांनी धाडस केले पाहिजे. शब्द जपून वापरला पाहिजे. लोकांमध्ये मिळून मिसळून काम करावे. कार्यकर्त्याच्या ताकदीवर नेता चालतो. सत्तेत परिवर्तन करण्याची धमक रासप कार्यकर्त्यात आहे. रासपला नुसते आमदार खासदार घडवायचे नाहीतर तर चांगले प्रशासकीय अधिकारी देखील घडवायचे आहेत, ही जानकर साहेबांची भूमिका आहे.

रासपचा २० वा वर्धापन दिन स्वाभिमानाचा असणार : ज्ञानेश्वर सलगर 

जानकर साहेब यांच्यामुळे वंचित उपेक्षित समाजात जागृती झाली असली तरीही, म्हणावे तसे राजकीय जाणीव झालेली नाही. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपली माणसे सत्तेत बसवावी लागतील. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रस्थापित पक्षांच्या अजेंड्यावर नाहीत. 20 वा वर्धापन दिन स्वाभीमानाचा वर्धापन दिन आहे. आम्हाला मजबुरीने मंत्रीपद दिले. जानकर साहेबांचा शब्द उशिरा का होईना खरा होता. कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने काम करावे, निश्चितपणे रासपचा मुख्यमंत्री आशाढी, कर्तिकी वारीला शासकीय पूजेसाठी जाईल.

यावेळी युवक आघाडीचे नेते अजितदादा पाटील, विदयार्थी आघाडीचे नेते शरदभाऊ दडस यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीसाठी ज्येष्ठ नेते सुदामशेठ जरग, माढा लोकसभा मतदार संघाचे परमेश्वर पुजारी, राज्य कार्यकारणी सदस्य भगवानराव ढेबे, कोकण महिला आघाडी नेत्या मनिषाताई ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, रायगड जिल्हा अध्यक्ष संपतराव ढेबे, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, शहरउपाध्यक्ष देवानंद मोटे, शशिकांत मोरे, दत्ता अनुसे सर, ऋषिकेश जरग, गोरख कोकरे, लहू दडस, धर्मराज बनगर, चैतन्य जरग, अंकूश दडस, राजगे मामा, पुंड साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

2 comments:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...