Saturday, June 24, 2023

तरुण जयंती मंडळाकडून मौ.पिंपळकुंठा येथे राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तरुण जयंती मंडळाकडून मौ.पिंपळकुंठा येथे राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तरुण जयंती मंडळाकडून मौ.पिंपळकुंठा तालुका मुखेड येथे राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आपल्या सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी अहिल्यादेवी यांनी न्यायालये स्थापन केली. गावात न्यायव्यवस्था निर्माण केली. ज्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना थेट अहिल्यादेवींकडे न्यायासाठी अर्ज करण्याची व्यवस्था केली. म्हणून अहिल्यादेवी या आदर्श न्यायाच्या प्रतीक आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अहिल्यादेवी यांनी शेतीचा कर कमी केला, शेतकऱ्यांना विहिरी बांधून दिल्या, जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना गाई दिल्या. हिंदूंच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार केला. त्यात काशी, द्वारका, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्यादेवी यांचे हे अजरामर कार्य आहे. त्याचा आपण गौरव केला पाहिजे, असे मनोगत यावेळी व्यक्त केले. अशोक नाईक उंद्रीकर, सचिन श्रीरामे सर, संजीव गुरुजी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जयवंत तरंगे, तुकाराम पाटील सूडके, बळीराम पाटील गोपनर, गावचे सरपंच, पोलीस पाटील, माजी सैनिक, जयंती मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...