दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
बारामती | दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर तृतीय यांच्यावतीने राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा संघटक चंद्रकांत वाघमोडे यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या महेश्वरच्या नर्मदा जलाने राजमातांचा अभिषेक करण्यात आला.
दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे पूर्व अध्यक्ष विश्वासराव देवकाते व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन सागर जाधव यांच्या हस्ते पूजा पाठ करून जलाभिषेक करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक व शंकर संकुल चे सर्वेसर्वा दत्तात्रय येळे सर, ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे, संचालक मदन नाना देवकाते, केशव बापू जगताप, तानाजीकाका कोकरे, जी. बी अण्णा गावडे, पोपटराव बुरुंगले, संगीताताई कोकरे, अनिल तावरे, स्वप्नील अण्णा जगताप, मंगेश जगताप, संजय नाना काटे, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, संचालक मंडळ सभासद कर्मचारी सर्व समाज बांधव विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती शहरात अहिल्यादेवींचे स्मारक नसल्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्यात असलेल्या पुतळ्यास नर्मदा जलाने अभिषेक व्हावा याकरिता मित्रवर्य श्री. चंद्रकांत वाघमोडे यांना नर्मदा जल पाठवले होते, त्यांनी आज अपेक्षेप्रमाणे कार्यक्रम घेवून माँसाहेबांना अभिवादन केले. होळकर राजघराण्यांच्या परंपरेनुसार आज देशभर अहिल्यादेवी माँसाहेबांना विविध माध्यमातून अभिवादन करण्यात आले. - रामभाऊ लांडे इतिहास संशोधक होळकर राजघराणे.
No comments:
Post a Comment