Saturday, June 24, 2023

चर्चगेट स्टेशनवर अहिल्यादेवींचा जयंती उत्सव

चर्चगेट स्टेशनवर अहिल्यादेवींचा जयंती उत्सव

चर्चगेट स्टेशनवर अहिल्यादेवींचा जयंतीउत्सव,मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगेंच्या वतीने आयोजन

 राज्यभरात बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र धनगर समाजन्नोती मंडळाच्यावतीने मुंबईतील चर्चगेट स्टेशनसमोरही जयंतीउत्सव साजरा करण्यात आला. यावेळी, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार आशिष शेलार, आमदार प्रशांत बंब, विद्या ठाकुर, चित्रा वाघ, देवयानी फरांदे, आयकर अधिकारी नितीन वाघमोडे, गणेश हाके आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आणि माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करुन मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती सांगितली. होळकर संस्थानाचा इतिहास विशद केला. त्याकाळात, अहिल्यादेवींनी समाजातील अनिष्ट रूढींना प्रखरतेनं विरोध करून लोककल्याणासाठी मोलाची भूमिका बजावली. तसेच, राज्य कारभार आणि न्यायदानात निष्णात कार्य केल्याचंही सांगितलं. 

दरम्यान, प्रकाश आण्णा शेंडगे यांनीही अहिल्यादेवींचा जाज्वल्य इतिहास सांगत मागास समाजाला दिशा देण्याचं आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम अहिल्यादेवींच्या माध्यमातून घडल्याचं म्हटलं. याकामी, मंडळाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष शांताराम दिघे व महिला प्रदेशाध्यक्षा विजया बावदने यांसह पदाधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन केले होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025