Saturday, June 3, 2023

पुकळेवाडीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन...!

 पुकळेवाडीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन...!

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर.

|पुकळेवाडी (सिध्देश्वर) :  मौजे ग्रामपंचायत पुकळेवाडी ता- माण जिल्हा - सातारा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सरपंच सौ. रंजना महादेव पुकळे यांच्या शुभहस्ते महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.  यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन पुकळे यांनी येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणा देऊन उपस्थित नागरिकांनी अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो अशा शब्दात जयजयकार केला. दरम्यान सरपंच व पोलिस पाटील यांच्या हस्ते सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सौ. जयश्री पुकळे व सौ. जगाबई पुकळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले.  

यावेळी पुकळेवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक संतोषकुमार माळवे,  पोलीस पाटील सौ. लता हेंमत पुकळे,  प्राचार्य गजानन पुकळे सर, ग्राम पंचायत सदस्य विजय पुकळे, आमदार जयकुमार भाऊ गोरे यांचे कार्यालयीन सहाय्यक सचिन पुकळे, आबासो पुकळे, बेस्ट कर्मचारी तुकाराम पुकळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुकळे, सुखदेव मोटे, सौ. विमलाबाई पुकळे, रत्नाबाई पुकळे, जगाबाई पुकळे, सिता पुकळे, आशा सेविका वर्षाताई कोकरे, ग्रामपंचायत कर्मचारी लालासो पुकळे, तात्यासो पुकळे व अन्य बंधू भगिनी उपस्थित होते.

अन्य क्षणचित्रे












No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...