Saturday, June 24, 2023

औंढा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी

 

औंढा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली...! आज दिनांक ३ जून २०२३ रोजी मौजे औंढा ता. औंढा (ना.) जि. हिंगोली.

मौजे औंढा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. विनायक भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे औंढा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विनायकरावजी भिसे सेना जिल्हाप्रमुख हिंगोली यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तसेच जयंती निमित्त जमलेल्या पंचक्रोशीतील सर्व मंडळींना विनायक भिसे शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित विनायक भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली, जी. डी काका मुळे, गणेश देशमुख, पैलवान सुनील खंडागळे, अनिल शिंदे, संजय भामगिरे, स्वप्नील पोले पिंटू जाधव, नरेश, करण मुदिराज, वाढवे, अमित राट्नालू आसिफ पठाण, रवी इंगळे, सोनू डांगे तसेच पंचक्रोशीतील समस्त नागरिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...