Saturday, June 24, 2023

ग्रामपंचायत कार्यालय फरदपूर ता.रेणापूर जिल्हा लातूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय फरदपूर ता.रेणापूर जिल्हा लातूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

आज ग्रामपंचायत कार्यालय फरदपूर ता.रेणापूर जी.लातूर येथे राजमाता , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करुन सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. प्रथमतः ग्राम पंचायत सदस्य श्री.सलीम पटेल यांनी श्रीफळ फोडले. सरपंच केसरबाई फुलचंद राठोड यांनी प्रतिमेस हार घालून अभिवादन केले.तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात ट्रॉफी व प्रमाणपत्र असे स्वरुप आहे. सविता रावसाहेब पवार व राजश्री सुरेश आमनावर या महिलांना सरपंच केसरबाई फुलचंद राठोड यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला. यावेळी संगणक चालक -आबासाहेब मदने, ग्रामरोजगार सेवक -अशोक राठोड, आशा कार्यकर्ती -मिरा मदने, अंगणवाडी सेविका - वृंदावनी कांबळे(गायकवाड) विजयाबाई पवार,प्रकाश राठोड, फुलचंद राठोड, रावसाहेब राठोड, गणेश मदने, मोहन फोलाने आणि इतर नागरिकांनी हजर राहून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, मनोगत मस्के बाळू गणपत यांनी मांडले तर आभारप्रदर्शन गणेश मदने यांनी मांडले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...