Saturday, June 24, 2023

आढाळा गावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

आढाळा गावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

काल माझ्या आढाळा गावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.आजपर्यंतच्या इतिहासात गावात प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी झाली.तरुण एकत्र आले की काहीही करू शकतात हे गावातील तरुणांनी दाखवून दिलं.

अगदी तीन चार दिवसांत नियोजन करून शांततेत आणि उत्साहात जयंती साजरी झाली.तसेच गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाची लवकरच स्थापना होणार असल्याने गावातील महिलांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि चौकाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी माझ्यासह गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, महिला, तरुण, जेष्ठ नागरिक आणि शिवमल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.. - भीमा हगारे 

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025