Saturday, June 24, 2023

दारव्हा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

दारव्हा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अहिल्यादेवी धनगर समाजोन्नती मंडळाच्यावतीने आयोजक दारव्हा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे प्रकाश नवरंगेसह आयोजक भास्कर उघडे यांच्या प्रयत्नाने निधी मंगल कार्यालय दारव्हा येथे तालुक्यातील धनगर समाज बांधव व खालील पाहुण्याच्या उपस्थित राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याची व समाजातील सर्व उपस्थितांची दारव्हा शहरात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीमध्ये अहिल्यादेवी रूपांत मुलींची घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. पूर्ण दारव्हा शहराला परिक्रमा करून रॅली कार्यक‘म स्थळी पोहचली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मान्यवराच्या हस्ते पूजा करून. कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिदास भदे, कार्यक‘माचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सचिन नाईक व महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रवक्ते अ‍ॅड. दिलीप एडतकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब शिंदे, संजय शिंदे पाटील, रेणू शिंदे, बाभूळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे डॉ. रमेश महानुर, शिवमाला नवरंगे, प्रकाश जानकर, नत्थू महानर, नाना महानर, प्रभूचरण कोल्हे, ज्ञानदेव गोरडे, राजेश गायनर, ज्ञानेश्वर ढोमणे, शारदा ढोमणे, डॉ. सुधाकर काळमेघ, प्रवीण शिंदे, कृष्ण कांबळे, मनोज उघडे, संदीप देवकते, बाबू कुकडे, गजानन गोरे, मोरेश्वर गोरे, प्रफुल लोथे, शरद लोथे, काळे मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नवरंगे यांनी केले. कार्यक्रमामध्ये रेणू शिंदे, राजेश गायनर, सचिन नाईक, प्रकाश जानकर, हरिदास भदे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्र विषयी समाजबांधवांच्या उपस्थित आपले विचार व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. दिलीप एडतकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक‘मासाठी आयोजक प्रकाश नवरंगे, भास्कर उघडे, अनिल लोथे, राजू चवात, जीवन उघडे, विलास कापडे, विशाल झाडे, विनोद गंदे, मनोहर नवरंगे, निरंजन गोरडे, बाळू नवरंगे, प्रल्हाद कचरे, भास्कर चवात, शंकर उघडे, सुदाम उघडे, श्याम उघडे, पवन उघडे, शंकर तूपटकर, नाना मोहोळ, गोविंदा नवरंगे व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...