Saturday, June 24, 2023

पिठी तालुका पाटोदा जील्हा बीड या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती खूप उत्साहात साजरी

पिठी तालुका पाटोदा जील्हा बीड या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती खूप उत्साहात साजरी 

पिठी तालुका पाटोदा जील्हा बीड या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती खूप उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ. मंगल प्रभाकर कवठेकर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे हे पाटोदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री राख साहेब हे होते. सर्वात आधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आरती करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्य शासनाने दोन पुरस्कार देण्यास सांगितले होते तरी आपण गावातील पाच महिलांना पुरस्कार दिला. तसेच ज्यांना बारावी मध्ये 75% च्या पुढे मार्क पडले आहेत त्यांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला आहे. त्यानंतर आपल्या पाटोदा तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री राख साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन आम्हास केले. हे सर्व झाल्या नंतर आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास डॉ. एकनाथ पवार, डॉ. जीवन चव्हाण, डॉ. अभिजित येवले हे आले होते. गावातील सर्व नागरिकांनी यावेळी सर्व चेक उप करून घेतले व यावेळी जवळपास 25 जनाचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन फ्री मध्ये होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती वेळी सुद्धा आरोग्य शिबिर आयोजित केले होते त्यावेळी सुद्धा 30 ते 35 जनाचे मोतीबिंदू ऑपरेशन फ्री मध्ये झाले होते. तसेच जालना ते चौंडी अशी नवीन गाडी जयंती निम्मित सुरू झाली होती आणि ती आमच्या गावातून जाणार होती त्यामुळे आम्ही ती गाडी गावामध्ये आली असता चालक वाहक यांचा वाजत गाजत सत्कार करण्यात आला. अश्या प्रकारे आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...