ॲड.अशोक सुरेश पुकळे यांचा सत्कार
ॲड.अशोक सुरेश पुकळे रा. म्हसवड जिल्हा - सातारा यांनी B.sc LLB ही कायदा पदवी (एलएलबी) उत्तीर्ण झाल्याबदल त्यांचा पुकळे कॉर्नर स्थित विरकर हार्डवेअर येथे मान्यवरांनी पुष्पहार गळ्यात घालून अभिनंदन केले. शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार केला. उपस्थितांनी त्यांच्या यशाचे कौतुक करताना अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आप्पासाहेब पुकळे (माण - खटाव विधानसभा अध्यक्ष रासप), ब्रह्मदेव पुकळे (मा. सरपंच पुकळेवाडी ग्रामपंचायत सदस्य - संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माण ), बबनदादा विरकर (रासप राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र, इंजि दादासाहेब दोरगे साहेब (सातारा जिल्हा उपाध्यक्ष रासप), पोपट मासाळ (मा.नगरसेवक म्हसवड नगरपालिका), सुरेश पुकळे (मा.नगरसेवक , मा.उप नगराअध्यक्ष म्हसवड नगरपालिका), आकाश विरकर, धनाजी विरकर, गणेश पुकळे, भागवत पुकळे, अनिल नामदेव पुकळे, अंकुश कोकरे (युवा उद्योजक) पै.विकास सारुख आदी मान्यवर उपस्थित होते. अशोक पुकळे यांनी कायद्याची पदवी प्राप्त केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुकळेवाडी ग्रामस्थांनी समाज माध्यमातुन अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment