Thursday, July 20, 2023

संत नामदेव महाराज यांच्या पायरी पासून रासपच्या जन स्वराज यात्रेस प्रारंभ

संत नामदेव महाराज यांच्या पायरी पासून रासपच्या जन स्वराज यात्रेस प्रारंभ

आम्ही कुणावर अवलंबून नाही; आम्ही आमच्या पायावर उभे : महादेव जानकर 

पंढरपूर (यशवंत नायक ब्यूरो) : आम्ही कुणावरही अवलंबून नाही, आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. आगामी काळात भाजपाने आमचा विचार केला नाही, तर एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

महादेव जानकर यांनी पंढरपूरातील श्री. विठ्ठल मंदिर येथील संत नामदेव पायरी पासून ‘जनस्वराज्य यात्रे’चा शुभारंभ केला. राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जानकर यांनी ही यात्रा काढली आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले, “जनतेने खऱ्या माणसाला आणि पक्षाला मत दिलं पाहिजे, असं आवाहन यात्रेच्या माध्यमातून करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी ही यात्रा सुरू केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ( एनडीए ) लोकसभेला जागा दिल्या नाही, तर एकला चलोरेची भूमिका घेणार आहे.”

“भाजपा आणि काँग्रेसवर किती दिवस अवलंबून राहायचं. आपला पक्ष वाढवण्याची गरज आहे. लोकसभेच्या ४८ मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात परभणी, माढा, बारामती, सांगली, ईशान्य मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथून मी लढण्याची तयारी केली आहे,” अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...