Thursday, July 20, 2023

सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे : महादेव जानकर

सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे :  महादेव जानकर

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षानिमित एक दिवशीय संवाद परीषदेत बोलताना महादेव जानकर बाजूस मान्यवर.

नागपूर : जोपर्यंत बहुसंख्याक उपेक्षित समाज सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही, तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळणार नाहीत, त्यामुळे ओबीसींनी आता सत्तेचे स्वप्न पाहिले पाहिजे, सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता सत्ताधीश व्हावे, असे आवाहन माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी  येथे केले.

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षानिमित तथा आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज व विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने एक दिवशीय संवाद परीषदेचे आयोजन सेवा दल महिला महाविद्यालय सक्करदरा येथे करण्यात आले होते, त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून श्री जानकर बोलत होते.

अरविंद माळी म्हणाले, सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय परिवर्तन अशक्य आहे.  याकरता स्वतःमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणावे लागेल. तसेच फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जनमानसात पोहोचण्यासाठी, आपल्याला प्रयत्न करावे लागतील.

विदर्भ तेली समाज महासंघाचे राज्य संघटक कृष्णाजी बेले अध्यक्ष होते. सेवादल महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय शेंडे स्वागताध्यक्ष होते. राष्ट्रीय समाज एम्पलॉयज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर उद्घाटक होते. राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे अध्यक्ष गोपाल भारती, सुशिलाताई मोराळे, शुभांगी घाठोळे, मिस्टर अफजल, हरिकिशन दादा हटवार, प्राध्यापक राहुल मून, अरुण गाडे, संजय रामटेके उपस्थित होते. संचलन एड. रमेश पिसे यांनी केले. विलास काळे यांनी भूमिका मांडली तर सुधीर सूर्वे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...