राष्ट्रीय समाज आणि राष्ट्रीय समाजाचे प्रश्न
राष्ट्रीय समाज पक्षाला साथ द्या..!
जन स्वराज यात्रेत सामील व्हा..!!
नुकताच मान्सून सुरू झाल्यामुळे गल्ली बोळासह जिकडे पाहावे तिकडे दलदल वाढलीय तशीच राजकारणातली दलदल वाढल्याचे चित्र समोर आलेले आहे. या दलदलीत अनेकांचे चेहरे माखले तर काही नामनिराळे राहिले. देशाच्या राजकारणात अनेक उलथापालथ घडवून आणल्या जात आहेत. पोकळ आश्वासने देऊन भ्रमाने फुगलेला भाजप पक्ष देशातील विविध राज्यातील सत्तेत आला आणि सत्तेतून पायउतारही झाला. काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणाना हाताशी धरून ऑपरेशन लोटस केले, त्यास काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अयशस्वी प्रयत्न झाला. भाजपाची महाकाय महत्वकांक्षा हळूहळू उरली सुरली सत्ता देखील गमावणार आहे. याचे उदाहरण कर्नाटक आहे. ऐन उन्हाळ्यात कर्नाटकात निवडणुकीमुळे रान तापले होते, त्याची धग देशभरात पोहचली व पोहचवण्यात आली. ज्या पद्धतीने भाजपने देशाला आश्वासने दिली, ती आश्वासने खोटी ठरल्याने देशभरात भाजपवरील विश्वास उडाला आहे. राज्यकर्त्यांनी कितीही २४ तास विजेच्या गप्पा मारल्या तरी आजही देशात ४४% जनता अंधारात आहे. अद्याप त्यांना वीज मिळालेली नाही. शेतकऱ्यांना महाराष्ट्रात भारनियमन करून रात्रीचा वीज पुरवठा केला जात आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांवर, दीन दुबळ्या वंचीतावर अत्याचार वाढत आहेत. गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली असताना भाजप सरकारने त्यांना सोडून दिले व त्यांचा जाहीर सत्कार केला. न्यायालयाकडे गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या महिलेस, गुजरात राज्याचे न्यायाधीश दवे संविधानाने दिलेल्या खुर्चीवरून बसून मनस्मृतीचे दाखले देत आहेत. मे महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर जळत आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओ समाज माध्यमात फिरल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री तोंड उघडत आहेत. गोदी मीडियामुळे अनेक वृत्तपत्र, वृत्त वाहिन्यांचे संपादक, पत्रकार राजीनामे देऊन बाहेर पडत आहेत. त्यातूनही काहीजण स्वतंत्रपणे आपले पत्रकारितेचे इमान राखून लिहत आहेत, बोलत आहेत.
उच्च शिक्षित तरूण संधीअभावी हताश झाला आहे. त्याचे पोट भरण्याइतपत त्याच्या हाताला काम नाही. शिक्षण क्षेत्राचे धिंडवडे निघतील अशी परिस्थिती आहे. पदव्युत्तर पदवीधर तरुणाई कंत्राटी नोकरी करून अल्प मानधनात आपल्या स्वप्नाचा चुराडा करून कशीबशी गुजराण करत आहे. नोकरीची हमी, भविष्य नसताना नवे शैक्षणिक धोरण लादत आहे. अभ्यासक्रमात छेडछाड केली जात आहे. इतिहासाच्या उदरात अनेक खरेखुरे देशाभिमानी क्रांतिवीर, स्वातंत्र्यवीर गडप आहेत. एक वर्षात मिळणारी पदवी दोन व्हाया चार वर्षे करून, वाढत्या वयात अधिकचे शैक्षणीक वय वाढवत आहे.
मंदिर, काश्मीर आणि समान नागरी कायदा हे मुद्दे मतदारांच्या पोटाचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. देशाचे अर्थकारण घरंगळत भुईसपाट होईल अशी स्थिती आहे. सर्वसामान्यजनांचे पोटापाण्याचे प्रश्न तीव्र होत आहेत. धार्मिक ध्रुवीकरण करून मुस्लिम-ख्रिश्चनांविरोधात गहजब निर्माण करून देशाने काय साध्य केले? परवा उत्तर प्रदेशातील एक गरीब शेतकरी प्रश्न विचारताना समाजमाध्यमांवर पाहिला. तो विचारत होता, ‘मुस्लिमांविरुद्ध ओरड करून हातात त्रिशूल घेऊन मंत्री-आमदारांची मुले धावताना, रक्तपात करताना तुम्ही कधी पाहिलीत का?’ गरीब बेरोजगार तरुणांची माथी भडकावून त्यांना रक्तपात, हिंसा करायला प्रवृत्त केले जातेय. देशातील ८० टक्के हिंदूंना २० टक्के अल्पसंख्याकांची भीती का वाटावी? आपला एवढा मोठा हिंदू धर्म, २० टक्के लोक कसे काय धोक्यात आणतील? हा प्रश्न या तरुणांना का विचारावासा वाटत नाही?
भटके विमुक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावून लढले, प्रसंगी बलिदान दिले. शहीद व्हावे लागले. त्यांच्या वारसदारांना स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश कायद्याची री ओढत गुन्हेगार ठरवले जातेय. पशुपालकांच्या नैसर्गिक अधिकारावर गदा आणली जात आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत या राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करणाऱ्या समाजकंटकास देशद्रोही न ठरवता त्याला पोलिस सरंक्षनात सभास्थळी पोहचवले जाते आणि देशाच्या ऐक्यासाठी, अस्मितेसाठी लढणाऱ्या देशप्रेमीना पोलीसबळ वापरून कायद्याचा धाक दाखवून रोखले जाते.
कित्येक दशके या देशातील राष्ट्रीय समाजातील बहुसंख्य घटक सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणीक स्वातंत्र्यासाठी झगडतोय. देशाच्या सर्वजनिक आस्थापनाचे खासगीकरण करून मूठभर उद्योगपतींचे लाड पुरवण्यासाठी कामगार वर्गाची मुस्कटदाबी राजरोसपणे सुरु आहे. कामगारांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेतले जात आहेत. अनेक समाज आपल्या भागिदारीसाठी आरक्षणासाठी रस्त्यावर येतोय, पण त्यांच्या मागण्यांकडे लक्ष विचलित करुण दुर्लक्ष केलं जात आहे. केंद्रीय नागरी सेवा मध्ये खासगी यंत्रणाद्वारे नोकरी भरती करून जिद्द चिकाटीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय केला जात आहे. लोकशाही संस्थांचे खच्चीकरण केले आहे, होत आहे. गोदी मिडियामुळे सारी प्रसारमाध्यमे प्रचार माध्यम होऊन एकसुरी बनली आहेत. राजकारणातील विरोधी पक्षांचे अस्तित्व कधीच धोक्यात आले आहे. प्रादेशिक पक्षांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागतेय. पार्टी विथ डीफ्रनसची बात करणाऱ्या भाजप सारख्या पक्षाला देशाच्या राज्याचा सत्तेपर्यंत पोहचण्यात मदत करणारा राष्ट्रीय समाज पक्ष आज प्रतिकूल परिस्थितीतही सत्तेला भिक न घालता स्वाभिमानाने चिवटपणे झुंज देण्याचा प्रयत्न करतोय त्यास तोड नाही.
विचारांचे अधिष्ठान नसलेले राजकिय नेते पक्षांतर करत आहेत. वर्षानुवर्षे सत्तेतून वारेमाप लूटलेली साधन संपत्ती वाचवण्यासाठी भाजपच्या तंबूत डेरेदाखल होत आहेत, भाजप त्यांना पोसत सन्मानाने सरंक्षन देण्यात कोणतीही कसर ठेवत नाही. लोकशाही देशात घराणेशाही पोसणाऱ्या पक्षांना स्वतःच्या नेत्यांचे प्रश्न सोडवताना दमछाक होत आहेत. लोकशाहीतून राजकरणात निकोप राजकरण होणे आवश्यक असताना देशाच्या सर्वोच्चस्थानाकडून एकाधिकारशाही सुरू असल्याचे जाणवत आहे. काही पक्षांनी हतबल होऊन केंद्रीय तपास यंत्रणापुढे हात टेकले आहेत. असे पक्ष राष्ट्रीय समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत.
राष्ट्र भक्कम करण्यासाठी राष्ट्रीय समाजाचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवावे लागतील. सर्वोतपरी राष्ट्र बळकट करण्यासाठी या देशाला एका चांगल्या राजकीय पक्षाची, नेतृत्वाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून भारतीय समाजाला पर्याय मिळाला आहे. फक्त राष्ट्रीय समाज पक्षाला आपला पक्ष समजून सत्तेत संधी देण्याची गरज आहे. देशाच्या व राज्याच्या राजकरणात विषवल्ली वाढत असताना त्यास छेद देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे स्वत: कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता राष्ट्रीय समाजासाठी निर्भिडपणे प्रस्थापित व्यवस्थेशी भिडतायत. विषमतेच्या मैदानात जमिनीवर घट्ट पाय रोवून लढतायत. भारतासारख्या विशाल राष्ट्रात 'राष्ट्रीय समाज भक्कम असेल तर भारत राष्ट्र भक्कम होईल'. राष्ट्रीय समाज पक्षाकडे महादेव जानकर यांच्यासारखे राष्ट्रीय बाणा असणारे नेतृत्व आहे. राष्ट्रातील उच्च वर्गीयापासून मध्यम ते शेवटच्या माणसासाला सामावून घेणारी सगळ्यात भारी विचारधारा रासपकडे आहे. राष्ट्राला सर्वोच्च प्रगतीपथावर नेणारे व्हिजन राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडे निवडणुकीच्या रणमैदानात लढण्यासाठी लागणारी साधसामग्री अत्यलप आहे. असे असूनदेखील राष्ट्रीय समाज पक्ष त्यागी, स्वाभिमानी, निष्ठावान अशा मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर 'राष्ट्र व राष्ट्रीय समाजाच्या आत्मसन्मानासाठी' मिशन लोकसभा - २०२४ अतंर्गत 'जन स्वराज यात्रे'द्वारा देशभरात आपल्या भेटीस येत आहे. तरी आम्ही यशवंत नायक परिवारातर्फे आपणास नम्र आवाहन करतो की, राष्ट्र व राष्ट्रीय समाज बलवान बनवण्यासाठी रासपच्या जन स्वराज यात्रेत सामील व्हा. राष्ट्रीय समाज पक्षाचा आवाज बुलंद करून देशाच्या सर्वोच्च सत्तेची सूत्रे जनतेने हातात घ्यावी.
|आबासो पुकळे, उपसंपादक यशवंत नायक
No comments:
Post a Comment