Thursday, July 20, 2023

उत्तर प्रदेशात हरिओम बाबू यांच्यामुळेच राष्ट्रीय समाज पक्ष उभारला : सिद्धप्पा अक्कीसागर

उत्तर प्रदेशात हरिओम बाबू यांच्यामुळेच राष्ट्रीय समाज पक्ष उभारला : सिद्धप्पा अक्कीसागर

मुंबई : हरिओम बाबू यांच्यामुळेच उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष उभारला, असे प्रतिपादन रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्किसागर यांनी केले. उत्तर प्रदेश रासपचे संयोजक हरिओम बाबू यांची जयंती रासेफ व यशवंत परिवारातर्फे आयोजित केली होती. 

जयंती निमित्त ऑनलाईन मार्गदर्शन करताना रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल अक्कीसागर म्हणाले, पशु नव्हे तुम्ही मानव कमाल देणगी अक्कल विधवा केली असे महात्मा फुले यांनी सांगितले आहे. हरिओम बाबू भारत दूरसंचार मध्ये नोकरी करत होते. त्यांनी नोकरी करत कुटुंबाला व समाजाला सांभाळले. 2016 च्या एप्रिल महिन्यात माझ्या घरी कुमार सुशील व मनोज अमरपाल आले होते. त्यानंतर पुढे त्यांच्या माध्यमातून हरिओम बाबू यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मला विचारले जानकर साहेब उत्तर प्रदेशला येतील का? मी म्हणालो, येतील. पुढे जानकर साहेब वाराणसीच्या दौऱ्यावर गेले आणि दौऱ्यात असताना साहेबांना मंत्री पदासाठी फोन आला. हरीओम बाबू म्हणाले, आपणास काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे. उत्तर प्रदेशात पार्टी हरिओम बाबू यांच्यामुळे उभी राहिली. त्यांची आठवण जपत जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनात देशभरात रासप तर्फे पहिला स्मृतिदिन साजरा केला. महाराष्ट्रात नालासोपारा येथे स्मृतिदिन कार्यक्रम झाला. 

ऑगस्ट २०१८ मध्ये जानकर साहेबांनी रासपच्या दिल्लीतील वर्धापन कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी जेवण ठेवलेले आणि तेथे हरिओम बाबू बोलत होते, माझे आज स्वप्न पूर्ण झाले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सुखी जीवन जगत असताना त्यांनी दू:खी जीवन जगल. त्यांनी खूप मोठा वारसा ठेवला. बहुसंख्याक समाज हा महामानवाची वाट पाहत असणारा समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. राष्ट्रीय समाज फेडरेशन हे बुद्धिजीवी व श्रमजीवी लोकांचे आहे. सर्वानाच महादेव जानकर, काशीराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनता येणार नाही, परंतु हरिओम बाबू जरूर होता येईल. राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांचे कार्य पुढे नेण्याचा निश्चय हरीओम बाबू यांच्या जयंतीनिमित्त करूया. जानकर साहेब यांनी हरिओम बाबू यांची जयंती साजरी करावी असे निर्देश दिले होते. कार्यकर्त्यांची आठवण जपणारा नेता महादेव जानकर आहे. हरिओम बापू यांच्याप्रमाणे कार्य करत रहा, कार्यकर्त्यातूनच नेता तयार होतो. 

यावेळी जयंतीप्रसंगी नरेश वाल्मिकी, दिल्ली रासेफचे वीरपाल, उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारी चंद्रपाल, इस्माईल बाटलीवाला, महाराष्ट्र राज्य सचिव ज्ञानेश्वर सलगर, दिगंबर राठोड साहित्यिक डॉक्टर जे. पी. बघेल,ल रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेफचे महाराष्ट्र सचिव जयसिंग राजगे सर यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी केले. बैठकीसाठी देशभरातून मान्यवर उपस्थित होते.

बातमी स्त्रोत : आबासो पुकळे, उपसंपादक यशवंत नायक.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...