जोतिबा मंदिर शिखराचा जिर्णोद्धार
पुकळेवाडी तालुका माण जिल्हा सातारा येथील जोतिबा मंदिराच्या शिखराचा जिर्णोद्धार ग्रामस्थ मंडळ पुकळेवाडी यांच्या तर्फे करण्यात आलेला आहे. मंदिराचा गाभारा पूर्ववत ठेऊन त्यावर जीर्ण झालेले शिखर हटवून त्या ठिकाणी नवीन शिखर बांधण्यात आले आहे. पूर्वीच्या शिखरात आणि आताच्या शिखरात बराचसा बदल केलेला आहे. पूर्वीच्या शिखराची उंची ही खूप मोठी होती, आताच्या शिखराची उंची कमी करण्यात आली असून शिखराचे काम मजबूत करन्यात आले आहे. शिखराच्या जिर्नोधराचे काम दिनांक ११/०६/२०२२ रोजी सुरू करण्यात आले. शेवटचे काम १०/०४/२०२३ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान काळभैरव मंदिराचे समोर चौफाळा बांधण्यात आला आहे. शिखराचे जिर्नोधराचे काम करणारे कारागीर नाव - एस पांडीए राजण आहे तर त्यांचा कायम रहिवाशी पत्ता - मु/पो देवकोटई तालुका - सिवगंगा, तमिळनाडू- ६३०३०२ हा आहे.
No comments:
Post a Comment