रासपचा विचार महात्मा फुलेवादाचा : काशीनाथ शेवते
अमरावती विभागिय मेळाव्यात बोलताना रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, फुलेपिठावर युवा नेते अजितदादा पाटील, गणेश मानवकर व अन्य |
अमरावती विभाग रासपचा कार्यकर्ता मेळावा यशस्वी
शेगाव (आबासो पुकळे) : राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या नेतत्वात राष्ट्रीय समाज पक्षाची घोडदौड देशभर सुरू आहे. रासपचा विचार हा फुलेवादाचा आहे. कार्यकर्त्यांनी फुलेवाद समजून घ्यावा. महात्मा फुले यांची पुस्तके वाचावीत, असे विचार राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी व्यक्त केले. श्री. शेवते हे रासप अमरावती विभाग कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
श्री. शेवते पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षात घराणेशाही नाही. धनदांडगे नेते, जातदांडगे नेते नाहीत. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेली, कोणताही राजकीय वारसा नसनाऱ्या माणसांचा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आहे. रासप सामाजिक चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पैशावर, निष्ठेवर चालणारा पक्ष आहे. रासप कलेकलेने वाढत चाललेला आहे. या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला स्वाभिमान देण्याचे काम जानकर साहेब करत आहेत. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता, भाजप सारख्या पक्षांना आपली गरज राहिली नाही. त्यांना आता मोठे पक्ष नेते मिळालेत, अमरावती विभागात आपली ताकद वाढवली पाहिजे. कोणत्याही निवडणुका लढताना कार्यकर्त्यांचे पाठबळ लागते. पैशावर नुसतं राजकारण होत नाही. कार्यकर्त्यांची फळी तयार करावी. मतांची टक्केवारी वाढल्याशिवाय छोटे पक्ष सत्तेत येणार नाहीत. राष्ट्रात राहणारा समाज हाच राष्ट्रीय समाज आहे.
यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवकचे नेते अजितदादा पाटील, अमरावती विभागाचे प्रभारी आणि विदर्भाचे उपाध्यक्ष डॉक्टर तौसिफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख अतुलभाऊ भुसारी, वाशिम जिल्हाध्यक्ष दीपक तिरके, बुलढाणा घटाखली जिल्हाध्यक्ष शिवदास सोनोने व नवनिर्वाचित अकोला जिल्हाध्यक्ष गणेश मानकर, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले, जिल्हा प्रभारी तोशिफ मोहम्मद, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष महेश तायडे, सुरेश काले, संतोष वनवे, मदन तिरके, आशिष कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment