कळंबोली शहराचे उभरते नेतृत्व : आपले अध्यक्ष आण्णासाहेब वावरे
आज १ जुलै २०२३ राष्ट्रीय समाज पक्षाचे कळंबोली शहर अध्यक्ष श्री. आण्णसाहेब वावरे यांचा वाढदिवस. कळंबोली शहरात सर्वसामान्य ते थोर लोकांपर्यत त्यांचा परिचय आहे. त्यांचे आडनाव वावरे असून भारतीय मराठी संस्कृतीत त्यांचे आडनावाला फार मोठे स्थान आहे. वावर हाय तर पावर हाय तशी त्यांची इलेक्ट्रिक क्षेत्रात वावरेंची पावर आहे. त्यांच्या कार्यकुशलतेने कळंबोली शहरात जनसामान्यांमध्ये त्यांचा चांगला वावर आहे. वावरे साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष झाले आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हळू हळू पक्षाचे काम वाढत आहे; कळंबोली शहरात नेतृत्व उभारत आहे. नेतृत्वाचे हात बळकट करण्याचे काम चोखपणे कार्यकर्ते बजावत आहेत. आपले अध्यक्ष म्हणून त्यांचा सामाजिक राजकिय सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा ठसा उमटत आहे. आगामी पनवेल महानगरपालिकेत वावरे साहेब यांच्या रूपाने राष्ट्रीय समाज पक्षाचे खाते उघडावे, हीच त्यांना आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा राहील. त्यांना निरोगी आयुष्य,आर्थिक, सामाजिक राजकिय क्षेत्रात भरारी घ्यावी अशी आई कुलस्वामिनी मायाक्कादेवी, मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना..!
शुभेच्छुक : राष्ट्र भारती आणि यशवंत नायक परिवार.
No comments:
Post a Comment