जन विरोधी सरकारने 'रासप'च्या जन स्वराज यात्रेस रोखले : एस. एल अक्कीसागर यांचे टीकास्त्र
धारवाड/कर्नाटक : यशवंत नायक ब्यूरो
काल "देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात चर्चगेट स्टेशन येथून निघालेली राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा ही जनता विरोधी सरकारने घाबरून जन स्वराज यात्रा रोखली, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य एस एल अक्कीसागर यांनी यशवंत नायक शी बोलताना सोडले. श्री. अक्कीसागर हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. धारवाड येथून ते यशवंत नायकशी बोलत होते.
श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, जनतेसाठी, जनतेद्वारा, जनतेच राज - जनतेच स्वराज या देशात आले पाहीजे, ही भुमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वात भारताच्या सर्व लोकसभा मतदार क्षेत्रात जनजागृती करत जन स्वराज यात्रा काढण्याचा संकल्प केला आहे. दिनांक १० जुलै २०२३ रोजी क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर संत नामदेव महाराज यांच्या पायरीपासून माढा लोकसभा क्षेत्रातून जन स्वराज यात्रेस सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने जन स्वराज यात्रेत लोक सामील होत आहेत. दि.२२ जुलै रोजी संत शेख महमद बाबा यांच्या दर्ग्यास अभिवादन करून अहमनगर लोकसभा क्षेत्रात पोहचली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी जन स्वराज यात्रेद्वारे रस्त्यावर उतरून थेट जनतेत मिसळत आहेत. जनतेच्या अडीअडचणी समजावून घेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने ही खोटी ठरल्याने देशभरात जनतेचा आक्रोश आहे. संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे जन स्वराज यात्रेत सहभागी होऊन जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सत्ताधारी घाबरले आहेत. रासपच्या जन स्वराज यात्रेचा धसका सत्ताधारी पक्षाने घेतला आहे. त्यातूनच देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात चर्चगेट स्टेशन येथून निघालेली जन स्वराज यात्रा जनता विरोधी सरकारने घाबरून जन स्वराज यात्रा रोखली. मिशन लोकसभा -२०२४ अंतर्गत संसद भवन दिल्ली लक्ष्य करुन महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जन स्वराज यात्रेस कोणी रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन श्री. अक्कीसागर यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, यशवंत नायकचे मार्गदर्शक हितचिंतक जयसिंग राजगे सर यांनी यशवंत नायकला मुंबईहून कळवले आहे की, काल मुंबई विभागात जन स्वराज यात्रा चालू असताना, राज्यशासन व प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून रोखण्याचा प्रयत्न केला तरी आज रविवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांची यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट, मंत्रालयाच्या समोर जाहिर सभा होणार आहे. तरी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाला ताकद देऊन जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे.
No comments:
Post a Comment