सलगरेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
आज सलगरे ग्रामपंचायत तालुका मिरज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत गट /ग्रामपंचायत क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सौ. स्वाती अनिल कांबळे (अंगणवाडी सेविका अंगणवाडी क्र. 208) व श्रीमती. वनिता विजय कुंडले आशा सेविका यांचा सन्मान करणेत आला. यावेळी सलगरे गावचे सरपंच सौ. जयश्री पाटील, उपसरपंच सौ. रुपाली हारगे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री. तानाजी पाटील, ग्रा.पं.सदस्य रमेश चाळके, विजय पाटील, अरुण कांबळे, ग्रा.पं. सदस्या सौ. सुनंदा चौगुले, सौ. सुनिता राजगे, सर्व अंगणवाडी सेविका, सर्व आशासेविका, ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment