'जम्मू काश्मिर'मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी
by Abaso Pukale,जम्मू| येथील भदरवाह शहरात भारतातील पहिल्या आदर्श महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ऑल जम्मू आणि काश्मीर गद्दी आणि सिप्पी ट्राइब्स वेल्फेअर असोसिएशन (AJKGSTWA) चे अध्यक्ष प्रवीण जरयाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपायुक्त दलमिर चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विकास अधिकारी श्री. सुनील कुमार विराजमान होते. मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोला फुलांचा हार घालण्यात आला व साखर,पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी माध्यमांशी बोलताना जरयाल म्हणाले, आज समाजात खुप आनंदाचे वातावरण आहे. आमच्या प्रेरणास्थान महारानी अहिल्याबाई होळकर यांनी ३० वर्ष राज्यकारभार करत देशासाठी काम केले. सैन्य दलात महिलांची फौज तयार केली. सती सारख्या प्रथेस कृतीतून विरोध केला. 31 मे 1725 रोजी जन्मलेल्या देवी अहिल्याबाई होळकर या महाराणी होत्या, ज्यांनी भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक परिदृश्यावर छाप सोडली. ट्राइबल समाजातून अनेक क्रांतिकारक या देशाला दिले; परंतु त्यांचे कार्य झाकून ठेवले आहे. उपायुक्त दलमिर चौधरी म्हणाले, ट्राइबल समाजाच्या उन्नतीसाठी सरकार योजना आखत आहे. त्यात समाजाचा सहभाग असायला पाहिजे.
यावेळी जयंतीनिमित्त गडयाली लोकनृत्य पार पडले. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श आमच्या महिलांनी घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया एक्का उच्चशिक्षित युवतीने दिली. हडल, कट्यारा, कंसार आणि भराई गावातील गड्डी, सिप्पी समाजाचे लोक सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment