Saturday, June 10, 2023

रंभातात्यांचा आज प्रथम पुण्यस्मरण....

 रंभातात्यांचा आज प्रथम पुण्यस्मरण....


 रामायण, महाभारत ग्रंथातील खजिना आपल्या ओघवत्या ग्रामीण भाषेत श्री. अमृत रामरसाळ या द्वारे श्लोकाची रचना करून ते दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तात्या आयुष्यभर झटले. त्यांच्या ग्रामीण मेंढपाळ गीत, लग्नाची गीते, देवांच्या आरत्या आदी साहित्यावर माझे मित्र प्रा. महादेव इरकर (वसई) यांनी प्रबंध सादर करून नुकतीच मुंबई विद्यापीठातून पीएचडी मिळवली. संताचे संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत कणकदास, संत सावता माळी, धनगर समाजात जन्मलेल्या संत जनाबाई यांचे ज्ञानामृत आमच्या सारख्याला उपलब्ध करून दिले. कुलदैवत जोतिबा, सिद्धनाथ, मायाक्कादेवी यांच्या आरत्या तयार केल्या. माता पुकळे जन्मभूमी नाथ सिध्दाजी कुलस्वामी या शब्दात त्यांनी मातृभूमीविषयी गौरोद्गार काढले आहेत. त्यांच्याजवळ लहान थोर हा भेदभाव नव्हता. त्यांचे विचार, कार्य लोकांसाठी होते. गोरगरीब लोकांबद्दल त्यांना आस्था होती.  तात्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन..!🌷

|आबासो पुकळे, पुकळेवाडी. 21/05/2023

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...