Saturday, June 24, 2023

त्रिंबक नगरपरिषद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र

त्रिंबक नगरपरिषद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र

माझी वसुंधरा 4.0 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!!  आज दि. 31 में 2023 रोजी त्रिंबक नगरपरिषद येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चोंडी ता. जामखेड जिल्हा अहमदनगर येथे झाला. माळवा प्रांताच्या जहागीरदार महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात संपूर्ण मालवा (माळवा) प्रांताची वेगाने प्रगती झाली. अहिल्याबाईंनी देणग्या देऊन माळवा प्रांतात तसेच भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा यांचेही मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले. इंदूर या खेड्याचे विकसित शहरात रुपांतर करण्याचे काम त्यांच्याच काळात झाले. शौर्य, धैर्य, आणि न्यायाच्या मूर्तीमंत रूप अशा अहिल्यादेवींच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...