Saturday, June 24, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अलंकापुरीत साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अलंकापुरीत साजरी

आळंदी / अर्जुन मेदनकर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त आळंदी पंचक्रोशीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेसह उपस्थित महिलांचे हस्ते प्रतिमा पूजन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त बाईक रॅली, मिरवणूक, महाप्रसाद वाटप, गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेकडो तरुणांनी रॅलीसह मिरवणुकीत भाग घेतला. व्याख्याते सचिन महाराज शिंदे यांचे व्याख्यान उत्साहात झाले. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त ४ जून ला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यात नागरिकांनी भाग घेण्याचे आवाहन यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...