धनज येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
शासनाच्या निर्देशानुसार धनज ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी जयंती साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने धनज ग्रामपंचायत येथे दिनांक 31 मे रोजी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व ग्राम बचत गटात काम करणाऱ्या दोन महिला सौ. महानंदा चरण डोंगरे आणि सौ नंदा गणेश वाळले या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. वनिता देवानंद पाचपुते, पोलीस पाटील बापुराव धनवे, तंटामुक्ती अध्यक्ष अनाजी बोंबले, ज्येष्ठ नागरिक जहांगीरमिया देशमुख, आंगणवाडी सेविका माला आमले यांच्याहस्ते या महिलांचा सत्कार करण्यात आला व पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक किशोर सोनटक्के, देवानंद पाचपुते, चरण डोंगरे आशा सेविका कल्पना व्यवहारे, सिंधू चिरमाडे आंगणवाडी कर्मचारी आरोना कांबळे, सरस्वती बोबंले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन अमोल जोगदंडे तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक किशोर सोनटक्के यांनी केले.
No comments:
Post a Comment