ग्रामपंचायत कान्हापुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
कुशल प्रशासक, महान राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. आज दिनांक ३१/०५/२०२३ रोजी ग्रामपंचायत कान्हापुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबध्दल ग्रामपंचायत स्तरीय "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " पुरस्कार ग्रामपंचायत मार्फत ट्रॉफी सन्मानपत्र व रोख रक्कम रुपये 500 देऊन सन्मान करण्यात आला तसेच गावामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला बचत गट प्रतिनिधी यांचाही सन्मान ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला यावेळी सरपंच प्रेम भैया चव्हाण ग्रामपंचायत सदस्या सौ.कोमलताई शिंदे, गोकुळा पाटील , कुमार आबा शिंदे, गिरजाप्पा पाटील, कैलास नगरे राहुल भारती ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब व महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment