Saturday, June 24, 2023

रांगणा ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

 रांगणा ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रांगणा येथे ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत स्तरावरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी सरपंच रंजना प्रकाश बोबडे, निता वासुदेव कातकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. बालविवाह प्रतिबंधक, बालमजुरी, सामाजिक योजना,जणजागृती गावांमध्ये शांतता राखण्यासाठी सहकार्य करणे,कोरोना काळात जनतेला सहकार्य व मार्गदर्शन करणे इत्यादी कामासाठी हा पुरस्कार सरपंच प्रकाश बोबडे, उपसरपंच दिलीप परचाके, पोलिस पाटील सविता वांढरे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली वांढरे,शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष राजेश वांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव कातकर, यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...