Saturday, June 24, 2023

ढोकी ता जि धाराशिव येथे अहिल्यादेवी होळकर चौकाचे मोठ्या थाटात उद्घाटन

 

महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जन्मोत्सवानिमित्त ढोकी ता जि धाराशिव येथे अहिल्यादेवी होळकर चौकाचे मोठ्या थाटात उद्घाटन


राजमाता पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जन्मोत्सवानिमित्त ढोकी ता जि धाराशिव येथे अहिल्यादेवी होळकर चौकाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.  चौकाचे उद्घाटन करून चौकात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चौंडीत अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर केले याचा जल्लोष करण्यात आला. बसस्थानक चौक, ग्रामपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक पेट्रोल पंप आदी ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अमोल पापा समुद्रे, निहाल भाई काजी, गुणवंत पापा देशमुख, संग्रामभैया देशमुख गुणवंत सुतार, पंकज देशपांडे, पोलीस पाटील राहुल वाकुरे, परवेज काजी, प्रमोद देशमुख, राहुल पोरे, सतीश वाकुरे, एजाज काझी व जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ धनगर समाज बांधव उपस्थित होते. जय मल्हार ! जय अहिल्या !! - अरुण डोलारे, ढोकी धाराशिव.   

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...