Saturday, June 24, 2023

राजेगांव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी

राजेगांव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी 

आज राजेगांव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यात आली त्याची काही क्षणचित्रे.

 या जयंती कार्यक्रमा निमित्त रक्तदान शिबीर तसेच सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच अजितदादा मासाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दौंड चे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे साहेब, दिपकजी सुरनर साहेब, दौंड पं स माजी उपसभापती उत्तमअप्पा आटोळे, राजेगांव ग्रां पचे सरपंच प्रविण लोंढे पाटील, राष्ट्रवादी युवक माजी अध्यक्ष मिलींद मोरे, दौंड पं स मा गटनेते नवनीतकाका जाधव, रा.स प नेते हरिष खोमणे, अजित पाटील, किरण गोफणे, संगिताताई धायगुडे, कृ. उ बा स संचालक आबासाहेब देवकाते, मदनवाडीचे उपसरपंच राजाभाऊ देवकाते, संभाजी देवकाते, आनंद देवकाते तसेच सर्वच क्षेत्रातील इतर अनेक, पदाधिकारी, राजेगांव ग्रामस्थ व समाजबांधव उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम प्रथमच राजेगांव येथे आयोजित करण्यात आला होता. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी दिपकजी सुरनर साहेब, राजेगांव ग्रां प चे उपसरपंच सोपानकाका चोपडे, हनुमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी पार पडला. यावेळी अनेक ग्रामस्थांनी सर्वरोग निदान शिबीराचा लाभ घेतला तसेच सुमारे ६० बॅग रक्त संकलन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...