Monday, May 29, 2023

अभिजीत काटकर यांची मुंबई पोलीसपदी निवड

अभिजीत काटकर यांची मुंबई पोलीसपदी निवड

कुकुडवाड : प्रतिनिधी

अभिजीत विठ्ठल काटकर रा. कुकुडवाड ता- माण यांची नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत मुंबई पोलीस पदी निवड झाली. अभिजीतने दहीवडी कॉलेज दहीवडी येथून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर आई वडिलांच्या सोबत शेतीत काबाड कष्ट करून पोलीस दलात भरती होण्यासाठी जीवाचे रान केले. प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व सायन्स ज्युनियर कॉलेज देवापूर येथे 'कमवा व शिका' योजनेतून पूर्ण केले. महाविद्यालयात अभिजीतवर एनसीसीचे संस्कार झालेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या अभिजीतने मुंबई पोलीस भरतीत यश मिळवल्याने कुकुडवाडच्या गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. जोतीर्लिंग दूध संकलन केंद्राचे धोंडीराम काटकर, सुखदेव पुकळे, कुकुडवाड वि.से. सो. माजी चेअरमन किसन काटकर, रयत सेवक जगन्नाथ काटकर, एस.एस.सी बॅच २०१५ चे मित्र आकाश, योगेश, निखिल, शंभू काटकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी अभिजितचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...