Friday, May 19, 2023

21 रोजी पुण्यात रासप विद्यार्थी आघाडीचे राज्यस्तरीय चर्चासत्र

21 रोजी पुण्यात रासप विद्यार्थी आघाडीचे राज्यस्तरीय चर्चासत्र

रासप विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांची माहिती

कळंबोली : येथे कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्कादेवीचे दर्शन प्रसंगी रासप विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस 

कळंबोली|राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर यांच्या मार्गदर्शनात पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीचे राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती, रासप विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी दिली. श्री. दडस हे कळंबोली येथे मायाक्कादेवी मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी ते प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी बोलत होते.

श्री. दडस पुढे म्हणाले, राज्यस्तरीय चर्चासत्रात नवीन शैक्षणिक धोरणातील राष्ट्रीय समाजाचे स्थान, विद्यार्थ्यांचे पुढील आव्हाने, बेरोजगारी, पदवीजिवी- बुध्दीजिवी संघटनेला छेद देऊन राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे बुध्दीवादी मजबूत संघटन तयार करणे, राष्ट्रीय समाजावर अन्याय करणारी शैक्षनिक धोरणे, बदलत्या परीक्षा पद्धती, सामाजिक न्यायासाठी आवश्यक जनगणना आदी विषयांवर चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात विद्यार्थी आघाडीचे विदर्भ, मराठवाडा, कोकण, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय चर्चासत्र रविवार दिनांक २१/०५/२०२३ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० यावेळेत राजगे बी. डी, श्रीरुप बंगला लेन नं. 3 A शिवशंभो कात्रज-कोंढवा रोड कात्रज पुणे ४६ येथे पार पडणार आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...