Friday, May 5, 2023

भाजप - काँग्रेसपासून जनतेने सावध राहावे : महादेव जानकर

भाजप - काँग्रेसपासून जनतेने सावध राहावे : महादेव जानकर

कागवाड |राष्ट्रभारती ब्यूरो चीफ 

काँग्रेस भाजप शासित राज्यात शेतकरी, वंचित उपेक्षित समाज, मजूर, अल्पसंख्याक यांना न्याय नाही. कर्नाटक राज्यातील जनतेने भाजप - काँग्रेसपासून सावध राहावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.  आ. जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारांचे प्रचारार्थ कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. कागवाड मतदार क्षेत्रातील रासपचे उमेदवार सतीश सनदी यांचा प्रचार करताना आ. जानकर माध्यमांशी बोलत होते.

आ. जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांना संधी द्यावी. तमिळनाडू, तेलंगणा राज्याच्या विकास दर चांगला आहे. आर्थिक, सामाजिक न्याय, सर्वसामान्य, शेतकऱ्यांसाठी वीज, पाणी उपलब्ध करून दिले आहे. प्रस्थापित पक्ष आम्ही सर्वांचेच सांगतात, पण कोण सेक्युलरच्या नावावर राज्य करत तर कोण हिंदूच्या नावावर राजकारण करत आहे. काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जातो,भाजपचा नेता काँग्रेस मध्ये जातो, गरीब जनता आहे तिथच राहते.  या दिनांक : २९ मार्च पासून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य सिद्धप्पा अक्कीसागर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रासपचे केंद्रीय निरीक्षक बाळकृष्ण लेंगरे, सतीश सनदी व अन्य रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...