अहिल्या नगरी इन्दूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची २९८वीं जयंती पर्व तीन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्यात साजरी झाली..!
३१ मे "इन्दौर गौरव दिवस" स्वरूपात साजरा होत आहे !
मध्यप्रदेश संस्कृति विभाग आणि इंदूर नगर पालिका निगम यांच्या सहयोगाने पूूयश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ वीं जयंती पर्वा निमित्त
#२९मे_रोजी इंदूर शहराचे विद्वान वरीष्ठ चिकित्सक डॉक्टर देवेंद्रजी तनेजा आणि शिक्षाविद् डॉ. अलकाजी भार्गव यांना वर्ष २०२२ आणि वर्ष २०२३ चे देवी अहिल्यानगर गौरव सन्मान देण्यात आले. या सन्मान सोहळ्या चे मुख्य अतिथी सूश्री उषादीदी ठाकूर, संस्कृती पर्यटन मंत्री मध्य प्रदेश सरकार आणि समितीचे संरक्षक श्री जयंत भिसे यांच्याहस्ते या दोन्ही विद्वानांना प्रत्येकी १,११,१११ अहिल्यादेवींची सुंदर प्रतिमा शाल श्रीफळ आणि कल्चरल हिस्टरी ऑफ होलकर स्टेट पुस्तक, मोमेंटो, अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सौ. कविता तिवारी लखनऊ या सुप्रसिद्ध कवियत्रीचे प्रभावी देशभक्ती काव्य गायन झाले.
अतिथींचे स्वागत समितीचे सचिव सुनील गणेश मतकर आणि अध्यक्ष मानवेंद्र त्रिवेदी उपाध्यक्ष अशोक अमणापुरकर, सौ. वंदना लालगे यांनी केले. मतकर परिवाराच्या वतीने सौ. अनिता सूनील मतकर, सौ. अर्पणा विपिन मतकर यानीं सूद्धा विद्वानांचे स्वागत केले. समितीचा परिचय उपाध्यक्ष डॉ. योगेंद्रनाथ शुक्ल यांनी करून दिला. विद्वानांचे अभिनंदनपत्र वाचन प्रदीप द. गावडे आणि डॉ. पंकज उपाध्याय यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मा आणि आभार लक्ष्मण दातीर यांनी मानले.
#३०_मे_रोजी अहिल्यादेवी जन्मोत्सव समिती इंदूर यांच्या अंतर्गत होळकर राज्यवंशाचे इतिहासकार डॉ. गणेश शंकर मतकर लिखित "इंद्रपूर से इंदौर" महानाट्य इंदूरच्या रवींद्र नाट्यगृहात मंचीत केले गेले. या महानाटकाचे दिग्दर्शक होते सुनील गणेश मतकर आणि सतीश मूंग्रे या नाटकात एकूण दहा समूहनृत्य पण होते, नृत्य निर्देशिका होत्या शांभवी तिवारी आणि संजना नामजोशी.
प्राचीन नगरी इंद्रपुरापासून इंदूर कसे झाले हे हे या नाटकाचे कथानक होते. या महानाट्यात तरुण अहिल्याबाई संगमा कुलकर्णी, प्रौढ अहिल्याबाई रूपाली रुद्र दुबे, मल्हारराव होळकर डाॅ. पंकज उपाध्याय, खंडेराव होळकर तुषार धर्माधिकारी, बाजीराव पेशवा श्री जठार प्रमुख भूमिकेत होते. याशिवाय सोहम कुलकर्णी, भूषण दीक्षित इत्यादी कलाकारांनी प्रभावी अभिनय केले. समूह नृत्यात प्रत्येक नृत्य वेगवेगळे नर्तकांची आकर्षक वेशभूषा होती. खूपच सुंदर मंच सज्जा केली होती प्रवीणजीं हरगांवकरांची तसेच प्रकाशयोजनाकार होते तपन शर्मा, रंगमंच सहायक होते यतीश मतकर, अभिराम मतकर. तुडूंब भरलेल्या रवींद्र नाट्यगृहात प्रेक्षकांनी, प्रत्येक प्रवेशांती टाळ्यांचा कडकडाट करून भरपूर दाद दिली.
सुरुवातीला अहिल्या जन्मोत्सव समितीचे संरक्षक जयंत भिसे, निदेशक उस्ताद अल्लाउद्दीन खां संगीत कला अकादमी व वरीष्ठ रंगकर्मी सूशील जोहरी यांनी भारतमाता आणि अहिल्यादेवींच्या चित्रा समोर दीप प्रज्वलन करून शुभारंभ केला. आणि शेवटी अहिल्या जन्मोत्सव समितीच्या मुख्य संरक्षिका सुश्री उषा दीदी ठाकूर संस्कृती मंत्री मध्य प्रदेश सरकार यांनी नाटकास हजर राहून नाट्यसमूहाचे स्वागत केले आणि देवी अहिल्यादेवींनां आदरांजली वाहिली. आभार प्रदर्शन सूनयना शर्मा यानीं केले .
31_मे_रोजी सकाळी सात वाजेला इंदुरचे हृदय स्थळ राजवाडा परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमे च्या चहूकडून 108 भजनी मंडळांनी आणि 108 बँड समूहांनी, ढोल पथकाने, लोककला दलांनी, प्रतिमेस परिक्रमा घालून अहिल्यादेेवींना आदरांजली वाहिली.
संपूर्ण राजवाडा परिसराचे वातावरण ढोल नगाडे शहनाई भजन याद्वारे भक्तीमय होऊन गेले होते.शखं घटांनाद होत होता देवाधिदेव शंकर महादेवाचा जलाभिषेक होत होता अहिल्यादेवींच्या परतिमेस माल्यार्पण करण्यास्तव अहिल्या भक्तांची मोठी क्यू लागली होती. चहुबाजूला अहिल्यादेवींचा जयजयकार होत होता सु श्री उषा दीदी ठाकूर व जयंत दादा भिसे यांनी प्रत्येक भजनी मंडळाचे व बँड पार्टीचे दलप्रमुखांचा भगवा दुपट्टा घालून त्यांचा सन्मान सुद्धा केला. राजू चव्हाण या कार्यक्रमाचे संचालन करीत होते.
याप्रसंगी होळकर राजवंशाचे इतिहासकार डॉ. गणेश शंकर मतकर यांची अनेेक इंदूरवासीयांना खूप आठवण येत होती, याचे कारण असे १९६० पासून डॉ. मतकरांनी अहिल्या जन्मोत्सव समिती स्थापन करून अहिल्यादेवींची जन्म जयंती पर्व साजरी करण्याची सुरुवात केली होती. त्यांनी महाराष्ट्रभर आणि उत्तर भारतात गावोगावी शहरा शहरात जाऊन त्यांच्या संग्रहीत साहित्याच्या चित्रांची प्रदर्शनी लावून, व्याख्यानं देऊन अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कार्याचा प्रचार प्रसार केला आणि आता हा जयंती पर्व संपूर्ण महाराष्ट्रात उत्तर भारतात गावोगावी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, याचे श्रेय अहिल्या जन्मोत्सव समिती संस्थापक डॉक्टर गणेश मतकर यांनाच आहे.