Tuesday, December 3, 2024

पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचा सत्कार

२ डिसेंबरला पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचा करणार सत्कार 

मुंबई  : महाराष्ट्रात २०२४ ची सार्वत्रिक विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढून राष्ट्रीय समाज पक्षाने आपले राजकीय बळ आजमवून पाहिले. युती आणि आघाडीच्या राजकारणात राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रात एकाकी झुंज दिली. रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी राज्यभर झंझावती दौरा करून प्रचाराचे रान उठवून मतदारांकडे आशिर्वाद मागितला. गंगाखेड मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने आपले स्थान टिकवून ठेवले. मात्र उर्वरित जागांवर अपेक्षित यश मिळाले नाही. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते रासप विधानसभा उमेदवारांचा सत्कार समारंभ सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल ,कोरेगाव पार्क, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समाज माध्यमांतून दिली आहे.

 राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांच्या सत्कार समारंभासह पक्षाच्या आगामी रणनीती संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी   राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या मतदार संघातील उमेदवारासह या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी केले आहे.


#पुणे  काल राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणुक 2024 उमेदवार यांचा सत्कार व पदाधिकारी बैठक राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली . व आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरली.






No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...