Sunday, December 29, 2024

मातृतिर्थाचा विकास शक्य नाही का ? : महादेव जानकर

मातृतिर्थाचा विकास शक्य नाही का ? : महादेव जानकर 

सिंदखेडराजा (१७/१२/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी आई जिजाऊंच्या जन्मस्थान असणाऱ्या शहराच्या विकासावरून नाराजी व्यक्त केली. महादेव जानकर म्हणाले, सत्व आणि स्वाभिमानाचे बाळकडू पाजून छत्रपती शिवरायांद्वारे रयतेचे समतामुलक स्वराज्य निर्माण करणाऱ्या आई जिजाऊंचे जन्मगाव विकासापासून वंचीत राहता कामा नये. मातृतीर्थ म्हटल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या गावाची दुरावस्था पाहून कायमच दुःख होते. येथे अनेक वेळा येणे झाले. जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेऊन या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. शहराचा सर्वांगीण विकास शक्य नाही का, असा सवाल ही त्यांनी केला.

राजकारणात पैशाचा बोलबाला झाला आहे. मतांची खरेदी हा सार्वत्रिक चिंतनाचा विषय आहे. हे जर असेच होत राहिले तर लोकशाही धोक्यात येईल, असे सांगून त्यांनी या विषयावर सर्वसमावेशक चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केली. लाडकी बहीण मदतिला आली हे खरे असले, तरीही मतदानयंत्रात दोष नव्हता, असे तितके स्पष्टपणे म्हणता येणार नाही.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025