ऑल इंडिया आरबीआय ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनचे महासचिव शैलेश मेस्त्री यांचे दुःखद निधन
मुंबई : ऑल इंडिया आरबीआय ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक सदस्य माननीय शैलेश मेस्त्री यांचे २१ जून २०२४ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ६३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. सागर सम्राट, ए विंग, ६ वा मजला, माहिम काॅजवे मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
दिवंगत शैलेश मेस्त्री ऑल इंडिया आरबीआय ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे संघटनेत संस्थापक सदस्य व अनेक वर्ष महासचिव होते. त्यांचा रिझर्व बँकेत, सामाजिक क्षेत्रात, कामगार संघटनेत बहुमूल्य योगदान होते. एस. एल. अक्कीसागर यांच्या बँकिंग सेवा, सामाजिक, राजकीय कार्यात दिवंगत शैलेश मेस्त्री यांची मोठी साथ होती. त्यांच्या सहकार्यामुळेच मी बरेच काही काम करू शकलो, अशी भावना श्री. अक्कीसागर यांनी व्यक्त केली आहे. माझे सहकारी, मित्र, भाऊ आज नाही याचे मला खूप दुःख होत आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा परिवार संघटना, सहकारी व हितचिंतक सहभागी आहेत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची हानी झाली आहे. या दुःखातून बाहेर पडण्याची परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाला शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करतो, असे श्री. अक्कीसागर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment