Monday, December 9, 2024

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने दिली सर्वच जाती धर्मातील उमेदवारांना संधी

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने दिली सर्वच जाती धर्मातील उमेदवारांना संधी 



मुंबई : महाराष्ट्रात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपचे महायुतीच्या आमिषाला बळी न पडता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रात युती, आघाड्यांच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेला पर्याय देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय समाज पक्षाने 288 जागावर स्वबळावर लढण्याचे घोषित केले होते. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडे एकूण 274 अर्ज प्राप्त झाले होते. राष्ट्रीय समाज पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी काही उमेदवारांनी राज्य निवडणूक समितीकडे मुलाखतीही दिल्या. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी 197 निवडणूक अर्ज (ए बी फॉर्म) उमेदवारांकडे पोहच झाले. 117 उमेदवारांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल केले. त्यापैकी  93 उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. काही उमेदवारांनी चांगला प्रचार प्रसार करत लढत दिली. महादेव जानकर यांनी जास्तीत जास्त ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. धनगर - ४१, मराठा - १३, बौद्ध - १०, मातंग - ७, वंजारी - ६, आदिवासी - ६, माळी - ५,  ब्राम्हण - ४,मुस्लिम - ३, कैकाडी - २, चांभार - २, भोई - २, बंजारा - २, आहिर - १, कलाल - १, कुणबी - १, खाटीक - १, जाट - १, जैन - १, तेली - १, राजपूत - १, रामोशी - १, लिंगायत वाणी - १, गोंधळी - १, वडार - १, सोनार -१ अशाप्रकारे अनेक जाती जमातीयुक्त ब्राम्हण, मराठा, एससी, एसटी, ओबीसी, धार्मिक अल्पसंख्यांक सहित बहुभाषिक सर्व समाजाला- राष्ट्रीय समाजाला संधी देण्याचे काम या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाने केले आहे. नांदेड लोकसभा पोट निवडणुकीमध्ये निराळी - ओबीसी या अत्यल्प समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाने आगरी, कुणबी, कोळी, मुस्लिम समाजातील उमेदवारी जाहीर केल्या होत्या, काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले व काही  उमेदवारांचा अर्ज विहित वेळेत पूर्ण न झाल्याने भरले गेले नाहीत. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे राष्ट्रीय समाज पक्षाचे काम केलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची दखल मा. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणी बैठकीत घेतली, असे यशवंत नायकला कळवले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...