चिंतन बैठकीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे विधानसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचा जाहीर सत्कार
पुणे (२/१२/२४) : आज मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक सभागृह पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ लढवलेल्या सर्व उमेदवार यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. तसेच राष्ट्रीय समाज पदाधिकारी यांची सार्वत्रिक विधानसभा निवडणुक -२०२४ चिंतन बैठक रासपचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडली. या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्य कार्यकारणी तर्फे केले होते. विधानसभा निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार मैदानात असतानाही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात यावे, पक्षाचा आदेश डावलनाऱ्या पदाधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करावी. अशा प्रकारची चर्चा पार पडली. विधानसभा निवडणूक आलेले अनुभव, निकाल व परिणाम यावर विचार मंथन व चिंतन करण्यात आले. निवडणुक लढवलेल्या उमेदवारांनी मनोगते व्यक्त केली. पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी काळातील पक्षाची रणनीती यावरही भाष्य करण्यात आले.
No comments:
Post a Comment