धनशक्तीच्या जोरावर लोकशाहीची हत्या होत आहे : महादेव जानकर
रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचा पूर्वांचल उत्तर प्रदेश दौरा
मिर्झापूर (२८/११/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पूर्वांचल उत्तर प्रदेश चा दौरा केला. 2024 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांची बैठक जिल्हाध्यक्ष अनिल कुमार पाल यांच्या घरी बरकछ कला या गावी आयोजित केली होती. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले, आज चारही बाजूने धनशक्तीच्या जोरावर लोकशाहीची हत्या चालू आहे. गरीब क्षत्रिय, दलित, मागास समाज विचारांची व तत्वांची लढाई लढत आहे, परंतु अर्थहीन असलेला समाज खडतर जीवन जगत आहे. पैशाच्या जोरावर धनदांडगे लोक तिकीट मिळवत आहेत तसेच मागास समजाला पाठीमागे ढकलत आहे. सर्वसामान्य लोकांचे खासदार, मंत्री बनून शोषण करत आहेत.
मोठमोठे राजकीय पक्ष सर्वसामान्य आपल्याच कार्यकर्त्यांना तिकीट देत नाहीत, पैशावर तिकीट वाटत आहेत. काँग्रेस भाजप आयात निर्यातीत व्यस्त आहे तर सपा बसपा परिवारदात मस्त आहे. बहुसंख्य समाजाची दिशाभूल करून दलित मागासांच्या नेत्यांना फसवून आपला स्वार्थ साधत आहे. सत्तेत येण्यासाठी मागासांची मते घेतात, मात्र भागीदारी देताना दुट्टपी भूमिका घेतात. प्रस्थापित पक्षांची मस्ती राष्ट्रीय समाज पक्ष उतरवेल, असा इशारा महादेव जानकर यांनी यावेळी दिला. गावामध्ये बँक, पाणी, विजेची सोय नाही. शेतकरी आपला अंधारात जीवन जगत आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांनी छोटे-मोठे आश्वासन देऊन शेतकरी, बेरोजगार, मजूर, युवकांना फसवले आहे, परंतु गावागावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जनजागृती करून यांना उघडे पडणार आहे.
No comments:
Post a Comment