Monday, December 9, 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे ९३ उमेदवार लढले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे ९३ उमेदवार लढले

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे रत्नाकर गुट्टे यांचा दणदणीत विजय

 गंगाखेड विधानसभा निवडणुकीत विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडीचे प्रमाणपत्र स्विकारताना रत्नाकर गुट्टे व अन्य.

मुंबई (२३/११/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडी शिवसेना उबाठाचे विशाल कदम यांचा दारुण पराभव करत दणदणीत विजय संपादन केला. रासपाचे विद्यमान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांना १३९६८१ मते मिळाली.  महाविकास शिवसेना उबाठाचे विशाल कदम यांना ११३९६४ मते मिळाली. यात रासपाचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी २६२९२ मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल कदम यांचा पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीचे सिताराम घनदाट मामा यांना ४२६३० मते मिळाल्याने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ही निवडणूक आमदार रत्नाकर गुट्टे यांनी विकासाच्या मुद्द्यावर लढली. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात तब्बल ५ हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना मतदारसंघतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. गंगाखेड विधानसभा मतदार क्षेत्रात डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विजय संपादन केल्यानंतर रासपचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांच्यासह देशभरातून राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.


राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. एकनिष्ठ राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बळावर ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. काही पदाधिकारी प्रस्थापित पक्षांच्या आमिषाला बळी पडल्याचे पहायला मिळाले. पाथरी विधानसभेत सईद खान यांनी जोरदारपणे लढत दिली व लक्षणीय मते मिळवली. राष्ट्रीय समाज पक्षाने अक्कलकोट, पाथरी, फलटण, पैठण, पारनेर, सिंदखेडराजा, अकोले, परभणी, रिसोड, कराड उत्तर, परांडा, देवळी पुलगाव, उस्मानाबाद, निलंगा, फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चांगली लढत दिली, मात्र महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजप महायुती आणि काँगेस महाविकास आघाडीच्या तुलनेत राष्ट्रीय समाज पक्षाकडे निवडणुकीची आयुधे, साधने नव्हती. रासपकडे राजनीति आहे पण निवडणुका जिंकण्यासाठी रणनीतीची उणीव आहे, असे बोलले जात आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या बळावर रासपने निवडणूक लढली. महाराष्ट्रात वंचीत, मनसे, तिसरी आघाडी यासारख्या पक्षांना खातेही उघडता आले नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभेत अस्तित्व कायम राखले. भाजप महायुतीने अमाप पैसा मतदारांना वाटल्याची चर्चा जनतेत होती. भाजप महायुतीने गैरमार्गाने विजय मिळवला असल्याचे बोलले जात आहे. भाजपला राक्षसी बहुमत मिळाल्याने राजकीय पंडित देखील चक्रावले आहेत. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमान आणि राष्ट्रीय समाजाच्या सन्मासाठी लढत राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत कुणाशीही आघाडी, युती न करता स्वतंत्र बाणा घेऊन लढल्याने राष्ट्रीय समाज पक्षाला असली, नकली, बनावट, निष्क्रिय, सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ते यांची खात्री करता आली. 

जिथे रासप उमेदवाराचे मत तिथेच मिळाली शून्य मते; ईव्हीएमवरचा विश्वास उडाला

२५० अक्कलकोट विधानसभा राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमदेवार सुनिल शिवाजी बंडगर यांचे नाव दोड्याळ गावच्या मतदार यादीमध्ये आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वा उमेदवार सुनिल दादा बंडगर हे मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले होते. पण २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला त्यात बुथ क्रमांक २७० दोड्याळ मतमोजणी मध्ये ० मते मिळाली आहेत. जर उमेदवार मतदान करुन देखील सुद्धा मतदान केलं नाही हे दाखवत असेल तर नक्कीच 'ईव्हीएम'मध्ये गडबड केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...