Tuesday, December 3, 2024

आगामी काळात महादेव जानकर डाव टाकणार...?, समुद्राच्या काठावर रासपचे शिलेदार

आगामी काळात महादेव जानकर डाव टाकणार..? समुद्राच्या काठावर रासपचे शिलेदार

मुंबई :  महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणी पदाधिकारी यांची मीटिंग बोलावली होती. निवडणुक निकाल व परिणाम, निवडणूकीत सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहभाग, निवडणूकीत आलेले बरे वाईट अनुभव, आगामी काळातील राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल याबाबत साधक बाधक चर्चा बैठकीत पार पडली, असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बंद खोलीत गुप्तगु न करता खुल्या रणमैदानात समुद्राच्या काठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी, राज्य कार्यकरणी पदाधिकारी यांच्यात बरीचशी खलबते झालीत. येत्या काळात महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्ष कोणता राजकीय डावपेच टाकणार हे पहावे लागेल. विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात छोटे मोठे सर्वच राजकीय पक्ष महायुती व महाविकास आघाडी, तिसरी आघाडीच्या वळचणीला गेल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रीय समाज पक्ष मात्र एकला चलो रे ची भूमिका घेऊन स्वतंत्रपणे 'स्वाभिमान व स्वबळ'चा नारा घेऊन निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटताना दिसला. महायुतीच्या महाराक्षसी दबावाला सर्वजण झुकत असताना महादेव जानकर यांनी ठामपणे राष्ट्रीय समाज पक्षाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. विश्वासू सहकारी यांच्या ताकदीवर राष्ट्रीय समाज पक्षाने अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला.

2 comments:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...