राष्ट्रीय समाज पक्ष आगामी काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार : महादेव जानकर
नांदेड (५/१२/२४) : येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. नांदेड दौऱ्यात मातोश्री मंगल कार्यालयात कौठा येथे हरिभाऊ शेळके व लक्ष्मी मंगल कार्यालय तरोडा बु. येथे मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानोबा ताटे यांच्या येथील लग्नं समारंभात उपस्थित होते. यानंतर दुपारी २.०० वाजता छत्रपती चौक बंदखडके कोचींग क्लासेस बिल्डींगमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकिला उपस्थित राहुन जानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. श्री. जानकर म्हणाले, कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर काम वाढवावे, यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासुनच कामाला लागावे, असे आवाहन केले. बैठकीत निवडणूक लढविलेल्या उमेदवाराचा सत्कार महादेव जानकर यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रम राष्ट्रीय संघटक तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बापुरावजी वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच महिला जिल्हाध्यक्षा म्हणून सौ. स्वराज्यताई मराठे यांची तर नायगाव, देगलुर, मुखेड मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आनंदराव राजूरे, हदगाव तालुकाध्यक्ष तुळशीराम चोंडे यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीला उतर नांदेडचे जिल्हाध्यक्ष भिमराव शेळके, देगलर तालुकाध्यक्ष आनंद राजुरे, भोकर तालुकाध्यक्ष मारोती वरणे, सौ. स्वराज मराठे, बापुराव वाकोडे, साहेबराव गोरठकर, संजय आलेवाड, राजेद्रं बंदखडके, डॉ श्रीराम राठोड, प्रा. तुकाराम साठे, तुळशीराम चोंडे, बालाजी नारे, अशोक दालपे, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक राजकीय हितचिंतक उपस्थित होते. बैठकीचे नियोजन व सुत्रसंचालन जिल्हा सचिव चंद्रकांत रोडे यांनी केले.
No comments:
Post a Comment