Sunday, December 29, 2024

संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी : शिवलिंगप्पा किन्नूर

संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी : शिवलिंगप्पा किन्नूर

जिल्हा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना शिवलिंगप्पा किन्नुर, बसवराज दोडमनी, देवेंद्र चिगरळली, महांतेश व अन्य.

कलबुर्गी (६/१२/२४) : देशाचे संविधान बदलण्याबाबत उघड वक्तव्य करणाऱ्या पासून सावध राहून, संविधानाचे रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर यांनी केले.

कलबुर्गी शहरातील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात संविधानाचे शिल्पकार डॉ बी. आर. आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिन निमीत्त अभिवादन करण्यात आले. श्री. शिवलिंगप्पा यांनी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी केंद्रात सत्तेवर असलेले सरकार जनताविरोधी, गरीबविरोधी असून भांडवलदारांचे सरकार सुरू असल्याचा टोला लगावला.

आपण डोळे झाकून संविधान नष्ट करणाऱ्यांना साथ द्यायची का? की संविधानाच्या रक्षणासाठी झटणाऱ्यांना साथ द्यायची? ते आपण समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. येत्या काळात प्रत्येक गावागावात संविधानाबाबत जनजागृती करण्यात येणार असून या देशाचे संविधान धोक्यात असून त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक राज्य प्रदेश सरचिटणीस शरणबसप्पा दोडमणी, जिल्हा अध्यक्ष देविंद्र चिगरअल्ली, जेवरगी तालुकाध्यक्ष महांतेश आवारदी, बसवराज राव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...