Monday, December 9, 2024

जोपर्यंत काँग्रेस आणि भाजपचे सरकार या देशात तोपर्यंत कोणाला आरक्षण मिळणार नाही : महादेव जानकर

जोपर्यंत काँग्रेस आणि भाजपचे सरकार या देशात तोपर्यंत कोणाला आरक्षण मिळणार नाही : महादेव जानकर 



फलटण (१४/११/२०२४ :भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू चांगले आहेत त्यांची नियत आणि नीती चांगली नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजात त्यांनी भांडणे लावायचे काम केले आहे. हे दोन्ही पक्ष अजिबात आरक्षण देणार नाहीत, हे जनतेने ध्यानात घ्यावे. जोपर्यंत या देशात भाजप आणि काँग्रेसचे सत्ता आहे तोपर्यंत कोणालाही आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे भाजप व त्यांच्या महायुतीला आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला मत देऊ नका ते दोघेही आपले नाहीत. म्हणून शिट्टीला मतदान देऊन दिगंबर आगवणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री यांनी केले.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात रासप चे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ महादेव जानकर फलटण येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी फुलेपीठावर रासकचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, पंचायत समिती सदस्य जयश्रीताई आगवणे व अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

महादेव जानकर पुढे म्हणाले, ज्या भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही ती केली त्यांनी आम्हाला धोका दिला. आम्हाला दोन जागा देऊन, त्या दोन्ही जागांवर कमळाचे उमेदवार उभे केले. तुम्ही मला नडलात आता मी तुम्हाला नडणार आहे. आम्ही तुमच्या सोबत होतो, म्हणून तुम्ही सत्तेत होता. आता आम्ही तुमच्या बरोबर नाही तुम्ही सत्तेत राहणार नाही, असा इशारा जानकर यांनी दिला. 

दहा वर्षे भाजप सोबत युती केल्याने आम्ही सडलो, कुजलो, आमचा पक्ष छोटा झाला, ही व्यथा आहे. तरीही मी स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व तयार केले. उत्तर प्रदेश, गुजरात मध्ये रासपचे उमेदवार जिंकून आले, पण सातारा जिल्ह्याने मात्र साथ दिली नाही, पाहिजे तसं प्रेम केलं नाही याचे शल्य आहे. मी भाजप किंवा काँग्रेसचा चमच्या नाही किंवा राष्ट्रवादीचा दलाल नाही, म्हणूनच मी माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा आणि दांडा घेऊन देशभर फिरतोय, स्वाभिमानाने तुमच्यासमोर उभा आहे. 

जानकर पुढे म्हणाले, "जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी पाहिजे असेल, तर देशात दिल्लीत  आणि राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार सत्तेत पाहिजे. 

*फलटणकरांसाठी एक चांगली संधी*

फलटण तालुक्यातील घराणे शाही आता जास्त काळ टिकणार नाही. फलटणकरांसाठी आता एक चांगली संधी चालून आले आहे दोन्ही निंबाळकरांच्या जाचातून मुक्त व्हायचे असेल तर शिट्टी ला मतदान करून दिगंबर आगवणे यांना आमदार करावे.  महायुती आणि महाविकास आघाडी बरोबर आम्ही नाही, आमचा बाणा लाचारीचा नसून स्वाभिमानाचा आहे, असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...