तेलंगणात कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष संघटन बुथ पातळीवर वाढवावे - महादेव जानकर
हैद्राबाद : येथे राष्ट्रीय समाज पक्ष तेलंगणा प्रदेश कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकिला मार्गदर्शन करण्यासाठी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष मा. सिद्धप्पा अक्कीसागर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी व मजुरांचा, कामगारांचा, शेतकर्यांचा मुलगा या लोकशाहीत राजा बनला पाहिजे, म्हणून पक्ष काढला आहे. कार्यकर्त्यांनी जिल्हा, तालुक्याच्या फादर बाॅडी, युवा आघाडी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी निर्माण करून बुथ बांधणी पर्यंत पुर्णपणे संघटन वाढवावे. येणाऱ्या सर्वं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करावी, असा संदेश दिला. तसेच रासेफचे अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर बोलताना म्हणाले, समाजातील बुद्धिजीवी लोकांनी गाव पातळीवर सत्यशोधन, समाज प्रबोधन व राष्ट्र संघटन करण्याचे काम करावे असे आवाहन केले. राष्ट्रीय संघटक गोविंदराम म्हणाले, तेलंगणात पक्षाचा विस्तार वन बुथ टेन युथ याप्रमाणे पक्षाचे संघटन वाढवून विधानसभा निवडणूकीत रासपाची भागीदारी असेल, असे कार्य करतील असे प्रतिपादन केले.
या बैठकीत तेलंगणा प्रदेशचे प्रभारी म्हणून रमाकांत करगाटला यांची नियुक्ती झाल्याबदल राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
प्रथम मिडियाच्या पत्रकारानी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांची पत्रकार परिषद घेतली . यावेळी माजी प्रभारी दत्तराम खताळ, सदाशिव पाटील, रमेश दोडामणी, एल. के अशोक , तुकाराम धुळगंडे, जे अनिल, द्याल श्रीनिवास, जेथंप्पा, नवनाथ, सुर्यकांत गुंडाळे, जयपाल कुरुमा राष्ट्रीय समाज एम्लाईज फेडरेशनचे कार्यकर्ते मदनेश्वर शूरनर, मायप्पा लवटे, मल्लिकार्जुन अबांमत, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment