Monday, December 9, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष* *महा'राष्ट्रीय' संकल्पनामा*

 *सत्य शोधन! समाज प्रबोधन!! राष्ट्र संघटन!!!*

                 *राष्ट्रीय समाज पक्ष* 

            *महा'राष्ट्रीय' संकल्पनामा*


1) *गुणवत्तापूर्ण शिक्षा, समृध्द राज्य* :-  "एक देश, एक विधान ,     सर्वांना शिक्षण एक समान". सर्वांना गुणवत्तापूर्ण मोफत एक समान शिक्षण धोरण राबविणार.


2) *सदृढ कुटुंब, समृध्द राज्य* :-  प्रत्येक कुटुंबाला उच्च गुणवत्तापूर्ण आरोग्याची शाश्वती देणार, 6 महसूल विभागात एम्स सारखी संस्था उभारणार, कुपोषण मुक्त करण्यासाठी शबरी संकल्प अभियान धोरण राबविणार.


3) *सामाजिक समता, समृध्द राज्य*:- सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करून समतामुलक समाज निर्माण करणारे धोरण राबविणार.


4) *संपन्न शेतकरी, समृध्द राज्य*:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी एकरी 50 हजार रुपये देणार, शेतीमालाला किफायतशिर भाव देणार, जो मागेल त्याला वेअर हाऊस, गोशाळा, कुकुटपालन इत्यादी व्यवसाय देऊन सक्षम करण्यासाठी धोरण राबविणार.


5) *युवकांना रोजगार, समृध्द राज्य*:- राज्यातील सर्व महाविद्यालयीन मुला-मुलींना स्वामी विवेकानंद योजनेच्या माध्यमातून मोफत लॅपटॉप व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार, बेरोजगार तरुण-तरुणींसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराभिमुख धोरण राबविणार.


6) *सक्षम महिला, समृध्द राज्य*:- महिलांना त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रत्येक क्षेत्रात समान वाटा मिळणारे धोरण राबविणार.


7) *सर्वजण सुखाय, समृध्द राज्य*:-  बेरोजगारांना शाश्वत नोकरी मिळेपर्यंत त्यांना प्रतिमाह 12 हजार रुपये बेरोजगार भत्ता देणार, वयोवृध्दांना स्वाभिमान पूर्वक राहण्यासाठी प्रतिमाह 6 हजार रुपये सन्मानश्री योजना राबविणार.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025